स्वच्छतेत निष्काळजीपणा भोवला चंद्रपूर मनपा सफाई कामगार निलंबित

चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ येथील सफाई कामगार श्रीमती किरण रामसिंग राठोड यांना स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करून कर्तव्यात हयगय व शिस्तभंग केल्याने निलंबित करण्यात आले आहे.

Recommended read: राज्यात शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त

सदर सफाई कामगार झोन क्र. १ येथे कार्यरत असुन त्यांच्याकडे संत कवलराम चौक ते विदर्भ हाऊसिंग चौक, दाताला रोड इत्यादीची झडाई, साफ सफाईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झडाई, साफ सफाई केल्यावर निघालेला कचरा उचलुन जमा करण्याकरीता मनपातर्फे त्यांना डस्टबिन देण्यात आली आहे.

परंतु सदर केर कचरा डस्टबिनमध्ये गोळा न करता नालीमध्ये टाकत असल्याचे मनपाचे सहायक आयुक्त यांच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले.

Recommended read: साहित्य संमेलन आयोजनासाठी संस्थांना सात लाखाचा निधी उपलब्ध करून देणार- आ. जोरगेवार

कर्तव्यावर असतांना स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करून कर्तव्यात हयगय व शिस्तभंग केल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिका कार्यालयाच्या आदेशान्वये सदर कामगार यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!