जीर्ण इमारत कोसळून महिला जंखमी झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेला जाग

सात जीर्ण व धोकादायक इमारती पाडल्या
चंद्रपूर महानगरपालिकेला जाग : १५ इमारतींना बजावली नोटीस

चंद्रपूर: घुटकाळा वॉर्डातील तुकडोजी महाराज पुतळा परिसरात एक जीर्ण व धोकायदाय स्थितीत असलेली दुमजली इमारत कोसळून एक महिला जखमी झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेला जाग आली आहे.

महानगरपालिकेने हद्दीतील १५ इमारती या अतिधोकादायक वर्गातील असल्याने त्यातील ७ इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेतर्फे घर सोडुन त्वरीत स्थलांतरीत करण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे.

Recommended read: अफजलखान विचारांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नोटीसीमध्ये इमारत शिकस्त व जीर्ण झाल्याचे नमुद असुन इमारतीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी अन्य सुरक्षित स्थळी त्वरीत स्थलांतरीत होण्याचे बजाविण्यात आले आहे. झोन क्र. १ अंतर्गत ६, झोन क्र. २ अंतर्गत ८ तर झोन क्र. ३ अंतर्गत १ इमारत अतिधोकादायक आहेत. या सर्व इमारतींना ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. यातील ७ इमारती पाडण्यात आल्या आहेत तर उर्वरितांना घरे रिकामी करण्याच्या २ नोटीस यापुर्वी व आता अंतिम नोटीस देण्यात आली आहे.

महानगरपालिका हद्दीतील बापट नगर, नगिनाबाग, नागपूर रोड, गौतम नगर, रामाला तलावाजवळील १ व मिलन चौक येथील २ इमारती अशा एकुण ७ अतिधोकादायक इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे.

Recommended read: सीबीआयकडून कोळसा खाणीच्या व्यवस्थापकाला ५० हजारांची लाच घेताना अटक

यापुर्वी घुटकाळा वार्ड येथील एकोरी प्रभाग क्र. १० येथील एक अतिधोकादायक इमारत कोसळून एक महिला जखमी होवून वित्तहानीही झाली होती. अश्या प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊन जीवितहानी व वित्तहानी होऊ नये याकरीता धोकादायक इमारतींचा वापर थांबवुन तात्काळ स्थलांतरीत होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!