पाणीटंचाई चंद्रपूर- IG Media Chandrapur

पाणीटंचाई विरोधात चंद्रपूर शहर काँग्रेसचे घागर फोडो आंदोलन

चंद्रपूर : शहरातील पारा ४० अंश सेल्सीअसच्या जवळ पोहोचला आहे. उकाळ्यामुळे जनता आधीच त्रस्त आहे. अशात मागील पाच दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु, या गंभीर समस्येकडे मनपातील सत्ताधारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यासर्व प्रकाराला मनपाचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे.

Recommended read: ज्या व्यक्तीने आग लावली आहे ती आग आता मी विजवणार – सुधीर मुनगंटीवार

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला आहे. मात्र, पाणी पुरवठा कधी पर्यंत सुरळीत होईल याची माहिती पदाधिकारी व पालिका प्रशासनाला नसल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी, २८ मार्चला दुपारी २ वाजता शहरातील मागील पाच दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी महानगरपालिकेसमोर घागर फोडो आंदोलन करण्यात आले.

पाणीटंचाई चंद्रपूर : इरई धरणातील पाण्याचा शहराला पुरवठा केला जातो. पाइप लिकेजमुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पाच दिवस लोटूनही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात मनपा प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच घागर फोडून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मनपा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. पाणी पप्रश्नावर मनपा गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

One thought on “मनपाच्या नाकर्तेपणामुळे चंद्रपूरकांचा घसा कोरडा”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!