चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे बंद झाल्याने शेकडो प्रवाशी जंगलातून रूळाच्या मार्गांने निघाले

चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे : पायदळप्रवाशांना सहन करावा लागला नाहक त्रास

चंद्रपूर: सर्वसामान्य नागरिकांची ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे मंगळवारी सकाळी गाेंदियाहून चंद्रपूरकडे येत असतांना केळझर येथील जंगल परिसरात अचानक बंद पडली. बराच वेळ होवूनसुध्दा गाडी सुरू न झाल्याने संतापलेल्या प्रवाशांनी थेट जंगलातून रेल्वे रूळाच्या मार्गांने पायदळ चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन गाठले.

Recommended read: लॉजवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे

अचानक रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. ग्रामीण भागातून चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातून चंद्रपूर शहरात नोकरीवर असणाऱ्या नोकरदारांची संख्या सुध्दा मोठी आहे. त्यामुळे चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे नेहमीची फुल्ल्ल असते.

Recommended read: गोसेखुर्द कालव्यात 11 वर्षिय मुलींचा बुडून मृत्यू

मंगळवारी सकाळी चांदाफोर्ट गोंदिया रेल्वे अचानकपणे केळझर जंगल परिसरात बंद पडली. बराच कालावधी होवूनसुध्दा रेल्वे जागीच असल्याने प्रवाशांना संयम सुटला. सर्व प्रवासी जंगलातून रेल्वे रूळाच्या मार्गांने पायदळ चांदाफोर्ट स्टेशनकडे निघाले. सर्व प्रवासी कडाक्याच्या थंडीत अवजड सामान सोबत घेत परत चांदाफोर्ट रेल्वे स्टेशनकडे गाठून आपल्या कामावर गेले आहे. रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, रेल्वेत नेमका बिघाड काय झाला याची माहिती मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!