जागतिक फार्मासिस्ट दिवस : चंद्रपूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट ग्रामीण संघटनेचे आयोजन

चंद्रपूर: प्राथमिक आरोग्य केंद्र घुगुस येथे चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना (ग्रामीण) च्या वतीने २५ सप्टेबरला जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला.

Recommended read: बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तलाठीकडेबैंक खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन

जागतिक फार्मासिस्ट दिवस कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष संजयराव भोंगळे, सचिव संजय मासिरकर, नारायण ठेंगणे प्रमुख्याने उपस्थित होते. यावेळी संजयराव भोंगळे यांनी सर्व फार्मासिस्ट यांना फार्मासिस्ट पदाची शपथ दिली. त्यानंतर रुग्णालयातील आजारी व्यक्तींना नारायण ठेंगणे यांच्या मार्गदर्शनात फळ वाटप करण्यात आले.

जेष्ठ केमिस्ट नारायण ठेंगणे यांनी सर्व उपस्थितांना फार्मासिस्ट आणि त्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संजयराव भोंगळे यांनी फार्मासिस्ट ची सामाजिक बांधिलकी या विषयावर मार्गदर्शन केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र घुगुसच्या सिस्टर रामटेके आणि इतर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला ग्रामीण संघटनेचे रमेश आगलावे, शैलेश भडके, विपिन भरणे, गंधर्व भगत, संदेश पोलशेट्टीवार, पंकज गावंडे, महेश चामाटे, गजानन भोयर, शिवा बिजमवार, राकेश झाडे, गणेश नांदे, रुपेंद्र पाझारे, विजय मेहता, मनोज सिद्धमशेट्टीवार, रोहन बांदुरकर, आणि अंशुल होकम इत्यादी फार्मासिस्ट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!