चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती वरील स्थगिती हटली

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक:- जिल्ह्यातील बेरोजगारांना सुवर्णसंधी

चंद्रपूर :जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, नोकरदार व सामान्य नागरिकांची बँक असलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीवर असलेली स्थगिती ही दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ च्या पत्रानुसार राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत हटविण्यात आलेली आहे. परिणामी जिल्ह्यातील बेरोजगारांना सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. व बेरोजगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने त्याचा विपरीत परिणामबँकेच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यानुसार नोकर भरतीकरीता बँकेतर्फे राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे रीतसर परवानगी मागण्यात आलेली होती. दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ च्या सहकार आयुक्तांच्या पत्रानुसार बँकेला ३६० पदे सरळ सेवेव्दारे भरण्याची मंजुरी देखील प्राप्त झालेली होती. मात्र दरम्यान भरती प्रक्रीया कार्यवाही सुरु असतांनाच दिनांक १२ मे २०२२ ला याच विभागातर्फे सरळ सेवेने भरावयाच्या पदास स्थगिती देण्यात आली होती, हे विशेष.

Recommended read: हनुमान मूर्तीच्या विटंबना प्रकरणी एक जण ताब्यात- बल्लारपूर चंद्रपूर रोड

महाराष्ट्रातील सहकारी बँकापैकी एक अग्रगण्य बैंक

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर ही महाराष्ट्रातील सहकारी बँकापैकी एक अग्रगण्य बैंक असून जिल्हयात बँकेच्या मुख्यालयातील ६ विभाग, ४ विभागीय कार्यालय व ८२ शाखांसह ११ पे ऑफीस, असे एकुण ९३ शाखा कार्यरत आहेत. बँकेला एकुण ८८५ पदांचे सेवकमांड (Stapping Pattern) मंजुर असुन आजस्थितीत बँकेत विविध श्रेणीत ५०१ कर्मचारी कार्यरत असून आजच्या स्थितीत ३८४ पदे रिक्त आहेत व दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत १३ पदावरील अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.

सधपरिस्थीतीत बँकेचे ९३ शाखांमार्फत ५०१ कर्मचारी घेऊन बँकेचे कामकाज चालविणे म्हणजे तारेवरची कसरत सुरु आहे. अशा परिस्थीतीत कर्मचारी भरती न झाल्यास बँकेचे कामकाज बंद पडुन ग्राहक सेवेत व्यत्यय / अडचण निर्माण होवुन शाखा बंद पडण्याची शक्यता आहे.

Recommended read: वरोरा :- नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात

जिल्ह्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानी

बँकेला ८३६००० ठेवीदार ३९२ सेवा / आदिवासी/ वि. का. सहकारी संस्थांचे १३५००० शेतकरी सभासद व मजुर सहकारी संस्था, मत्स्यपालन व दुग्धपालन सहकारी संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, कर्मचारी सहकारी पतसंस्था व त्यांचे सभासद बँकेच्या व्यवहाराशी जुळलेले आहे. जिल्हयातील शेतक-यांना शेती व शेतीपुरक व्यवसायात कर्जवाटप करून जिल्ह्यात बँक अव्वल स्थानी आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, माध्यमीक व आश्रम शाळांचे शिक्षक व कर्मचारी यांचे पगार वितरण करणेचे काम बँक करीत आहे. पगारदार कर्मचा-यांना सि.डी.सि.सी. बँक सॅलरी पॅकेज अंतर्गत रु.३०.०० लाखाचे अपघाती विम्यासह विविध सवलती बँकेकडून विनामुल्य देण्यात येत आहेत. शासकीय विविध निराधार योजने अंतर्गत निधी वाटपाचे काम करीत आहे. जिल्हयातील ८० टक्के किसान योजनेअंतर्गत निधी वितरण तसेच दुष्काळी परिस्थीतीत मिळणारी आर्थिक मदत वितरणाचे काम करीत आहे. ठेवीदारांना प्रधानमंत्री योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविण्यात बैंक अग्रेसर आहे. महिला बचतगट स्थापन करून गटांना कर्ज वितरण करण्यात बैंक महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थानी आहे.

Recommended read: आवळगावात धुमाकूळ घालणारा K-4 वाघ जेरबंद

आर्थीकदृष्टया सक्षम व नियमानुकूल व्यवसायीकता बाळगणा-या राज्यातील १४ बँकांमध्ये बँकेचा समावेश असून शासकीय निधी गुंतवणूकीची बँकेला मान्यता आहे. ग्रामीण भागातील जनतेस तत्पर बँकींग सेवा उपलब्ध होण्याचे दृष्टीने व बँकेचे कामकाज सुचारु पध्दतीने चालविणेकरीता कमी मनुष्यबळासोबत बँक कार्यरत आहे.

नोकर भरती वरील उठवलेली स्थगिती ही बँकेच्या हिताची

विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात सदर बँकेचा एनपीए शून्य असून महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम १९६० व १९६१ तरतुदी नुसार सर्व मापदंडाचे पालन करुन बँकेला १६ कोटी ५६ लाखाचा नफा झाला. एव्हढी भक्कम बाजू असताना बँकेची नोकर भरती ही बँक सुरळीत सुरू असावी, याकरीता अती आवश्यक बाब बनली आहे. त्यामुळे राज्य शासनाने नोकर भरती वरील उठवलेली स्थगिती ही बँकेच्या हिताचे ठरणार आहे व स्थानिक बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Recommended read: लॉजवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे

अत्यंत अडचणींना सामोरे जावून, अपुऱ्या मनुष्यबळासह, सामाजिकता व बँकेचे हित जोपासत बँकेला राज्यात क्रमांक एकवर आणले. मात्र भरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अकारण राजकारण करुन बँकेला वेठीस धरल्या गेले. मात्र राज्य शासनाने भरतीबाबत लोकहितार्थ निर्णय घेतला. राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करून सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबवू . संतोष रावत, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!