mosquito, insect, mosquito bite-49141.jpg

आपल्या घरी डेंग्युची सुरवात तर नाही ना
मनपा सर्व्हेत १०८८५ घरांची तपासणी

चंद्रपूर: डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेमध्ये ३० टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. सध्या पावसाळ्याची सुरवात असुन डेंग्यु व इतर कीटकजन्य आजार पसरु नये या दृष्टीने मनपामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

recommended read – https://igmedias.com/death-of-a-pregnant-woman-and-her-baby-in-the-womb-a-question-mark-on-the-health-system-in-gadchiroli/


   मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात आहे. सर्वे अंतर्गत आतापर्यंत १०८८५ घरांची तपासणी करण्यात आली असुन यात ३० टक्के घरे दुषित आढळली आहेत. हे प्रमाण मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.        
   डेंग्युचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.
    डेंगू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे डांस वाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे.डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

2 thoughts on “सावधान…. ३० टक्के घरांमध्ये आढळली डेंग्यूची अंडी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!