शॉर्ट सर्किटमुळे कॅफे मद्रास ला भीषण आग- IG Media Chandrapur

काही काळासाठी मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प

चंद्रपूर: शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कॅफे मद्रास या हॉटेल ला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लोकमान्य टिळक शाळेसमोरील कॅफे मद्रास या हॉटेलला सकाळी दहा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग वेगाने वाढू लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

Recommended read: चिचपल्लीजवळ चारचाकी वाहनाचा भिषण अपघात

घटनेची माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणली असून आगीवर ताबा मिळवला आहे. या आगीमुळे हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

2 thoughts on “शॉर्ट सर्किटमुळे कॅफे मद्रास ला भीषण आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!