चंद्रपुरात युवकाचा निर्घृण हत्या संशयावरून एका युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

चंद्रपूर: शहरातील बल्लारपूर बायपास रोडवर असलेल्या अष्टभुजा वार्डात एका 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले आहे. नेमकी हत्या कशासाठी करण्यात आली याचा पोलीस शोध घेत आहेत.

Recommended read: वाघाच्या हल्यात पत्नी ठार तर पती चा शोध सुरू

अष्ठभुजा वार्डातील 20 वर्षीय धर्मवीर उर्फ डबल्या अशोक यादव या युवकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका निर्जन स्थळी फेकून देण्यात आलेला होता. सकाळी काही नागरिक फिरण्यासाठी गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती नागरिकांनी शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अशोक यादव या तरुणाचा निर्घृण हत्या का करण्यात आला याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

2 thoughts on “चंद्रपुरात युवकाची निर्घृण हत्या, संशयावरून एका युवकाला पोलिसांनी घेतले ताब्यात”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!