सातबारा वर नाव नोंदणीसाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना अटक

चंद्रपूर : सातबारा रेकॉर्डवरील आजीचे नाव कमी करुन स्वत:चे नाव चढवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी व कोतवालास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक केली.

धाबा साज्याचे तलाठी ओंकार संजय भदाडे व कोतवाल चंद्रकांत नेमचंद मुंजेकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Recommended read: शाळेत जाणे टाळण्यासाठी त्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव

धाबा येथील तक्रारदाराची आजी सन २०२१ मध्ये मरण पावली. तिच्या नावावरील धाबा येथील शेत सर्व्हे नं. १४३,२ मध्ये ०.८१ हेआर व काढोंना येथे शेत सर्व्हे नं. २४ मध्ये ०.५२ हे आर शेती आहे. त्या शेतीवरील आजीचे नाव कमी करुन त्याचे व नातेवाईकाचे नाव चढविण्यासाठी धाबा तलाठ्यांकडे अर्ज केला. त्यांना सातबारा रेकॉर्डला नावाची नोंद करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली. दोन हजार रुपयात तडजोड झाली.

मात्र त्याला लाच द्यायची नसल्याने याबाबतची तक्रार तक्रारकर्त्यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे लाचलुचपत विभागाकडे केली. त्यांनी सापळा रचला यावेळी तलाठ्याने कोतवालाच्या हस्ते लाच स्वीकारल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

Recommended read: ट्रकच्या धडकेत महिला ठार संतप्त जमावाने १० ट्रक पेटवले

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नरेशकुमार नन्नावरे, संदेश वाघमारे, राकेश जांतुकर काचोळे, सतीश सिडाम आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!