नक्षलवाद्यांनी दोघांची दगडाने ठेचून हत्या, परिसरात दहशत

गडाचीरोली: जिल्ह्यातील हेडरी पोलीस उपविभागीय क्षेत्रातील गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या परिसरात नक्षलवाद्यांनी दोन इसमांची दगडाने ठेचून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा लोहखनिज प्रकल्प सुरजागड येथे पालकमंत्र्यांच्या पहिल्या जाहिर कार्यक्रमानंतर नक्षलवाद्यांनी सक्रिय होऊन दोघांची हत्या केल्याची खळबळ उडाली आहे.

Recommended read: वेजगावात वाघाचा हल्ला दोघेजण गंभीर जखमी

नक्षल्यांनी केलेल्या हत्या मधील एक ग्रामस्थ दलसु हिचामी हा झारेवाडा येथील पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून झाल्याची प्राथमिक असून दुसरा आत्मसमर्पित नक्षली नवीन उर्फ अशोक पेका नरोटी याची गोलगट्टा येथे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

काल दुपारी 2 वाजता सुरजागड लोहखनिज टेकड्यांवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहिर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा 12 तासांचा कालावधी उलटण्याआधीच नक्षल्यांनी दोघांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!