प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वैनगंगा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी(देशपांडे) येथील नाल्यासमोर वैनगंगा नदीच्या काठावर प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळळ उडाली आहे.

Recommended read: नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान

शिवणी (देशपांडे) येथील नदीकाठावर विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून असल्याची गुप्त माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. माहितीच्या आधारावर घटनास्थळ गाठून ठाणेदारांनी मृतदेह ताब्यात घेतले. हा कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओडख पटवणे शक्य नाही. मृतदेह वैनगंगा नदीपासून ५० फूट अंतरावर आहे.

Recommended read: रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी ठार

आठवडाभर पूरपरिस्थिती असल्याने मृतदेह वाहून आला की घातपात आहे यादृष्टीने पोलीस तपास करीत असून प्लास्टिक मध्ये मृतदेह आढळल्याने घातपाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!