भद्रावती येथील तरुणीच्या मृत्यूचे रहस्य वाढले, तरूणींची अद्याप ओळख पटली नाही

पोलिसांचे ओळख पटवण्याचे आवाहन

चंद्रपूर: भद्रावती शहरातील सुमठाणा– तेलवासा रोड मार्गावरील शासकीय आयटीआय समोरील झाडे यांच्या शेतात एका अंदाजे २५ वर्षीय युवतीचे धडावेगळे निवस्त्र अवस्थेत शव आढळून आले होते. या तरूणींची २४ तास उलटूनही ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तरुणीच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे.

Recommended read: भद्रावती येथील शासकीय आयटीआय समोरील घटना

भद्रावती येथील काही नागरिक फिरण्यासाठी गेले असता, त्यांना एका युवतीच मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरिवंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक दाखल होवून पंचनामा करण्यात आला आहे. डी एन ए टीम चाचणी केल्यानंतर युवतीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी पंचनाम्यानंतर युवतीचे मृतदेह चौकशीसाठी पाठवण्यात आला.

Recommended read: आठ वर्षीय ध्रुवची ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ‘ मध्ये नोंद

पोलिसांनी सोमवारी व मंगळवारी चौकशी केली असता जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तरुणी बेपत्ता किंवा अपहरणाची एकही तक्रार नाही. त्यामुळे पोलिसांनी एक पत्रक काढून युवतीचे ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांना मृत तरुणीचे डोके आढळून आलेले नाही. याप्रकरणी भद्रावती पोलीसांशी संपर्क साधला असता त्यांनी मृतक तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे सांगितले.

अत्याचार केल्यानंतर खून करण्यात आल्या असल्याचे परिसरात बोलले जात आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

One thought on “भद्रावती येथील तरुणीच्या मृत्यू चे रहस्य वाढले, तरूणींची अद्याप ओळख पटली नाही”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!