युवतीची ओळख पटली, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे मोठे यश

संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर

चंद्रपूर: भद्रावती येथे तेलवसा मार्गावरील मक्रोन शाळेच्या मागील परिसरात ओसाड शेतात एका 22 वर्षीय युवतीचा शीर नसलेला निवस्त्र मृतदेह आढळून आल होता. सदर युवतीची ओळख पटली असून नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे.

निर्घृण हत्या करून मृतक तरुणींची ओळख पटू नये ह्यासाठी शीर कापून युवतीचा नग्न मृतदेह फेकून देण्यात आला होता. त्यामुळे चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून मृतदेहासह परिसराची पाहणी केली. हत्या करणाऱ्याने गुन्ह्याचे पुरावे, खुणा, निशानी सोडली नसल्याने सदर मृत तरुणीची ओळख पटविणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.

Recommended read: शरद पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी हल्ल्याचा चंद्रपुरात निषेध

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांचे मार्फतीने मृत महिलेच्या शरीरावरील खुणा, मृत देहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तु ईत्यादी शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्हयातुन मागील काही दिवसांत ह्या वयाच्या हरवलेल्या / पळुन गेलेल्या मुलींच्या माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. घटना घडुन काही दिवस होवुनही कोणत्याही मुलीच्या हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रीक तपास केला असता त्यामध्ये पोलीसांना यश आले.

Recommended read: अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी जमिनीत पुरला मृतदेह

गोपनिय माहितीदाराकडुन सदर युवतीची ओळख पटविण्यात आली तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला, त्यावरुन तिच्या राहते घराचा रामटेक जिल्हा नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला त्यावरून तिची मोठी बहीण हिच्याशी संपर्क साधुन ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिच्या बहीणीने तिच्या शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तु पाहुन मृत महिला ही तिची बहीण असल्याची खात्री केली.

मृतक युवती ही स्वतंत्र राहत असल्याने ती बेपत्ता असल्याचे अथवा तिच्या सोबत कुठलीही अप्रिय घटना घडली असल्याची कुटुंबीयांना संशय आला नसल्याने पोलिसांना कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन, सायबर सेल चे विविध पथक पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात तपास करीत आहेत.

One thought on “अखेर “त्या” युवतीची ओळख पटली, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलचे मोठे यश”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!