राहुल बालमवार व मनदीप रोडे चंद्रपुर मनसे जिल्हाध्यक्ष

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यानंतर संघटनेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

मनसेच्या जिल्हा कार्यकारिणीत खांदेपालट करताना राहुल बालमवार व मनदीप रोडे असे दोन जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आले असून सचिन भोयर यांच्याकडे चंद्रपूर महानगर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Recommended read: माफी मागा अन्यथा, न्यायालयात दावा ठोकू-मनसे

राहुल बालमवार आणि मनदीपभाऊ रोडे यांना जिल्हा प्रमुखपदी बढती मिळाली आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी तीन विधानसभा विभागून देण्यात आल्या आहेत.

बालमावर यांच्याकडे वरोरा, चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभेचा कार्यभार राहील. आधी त्यांच्याकडे विधानसभेची जबाबदारी होती.

Recommended read: राज्य सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत

शहर अध्यक्ष रोडे यांच्याकडे आता राजुरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर विधानसभेचा कार्यभार राहील. रोडे यांच्या जागेवर भोयर यांना शहर अध्यक्षपद मिळाले आहे. तर जिल्हाध्यक्ष दिलीप रामडेवार यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर सर्वच कार्यकारण्या बरखास्त होईल, असे संकेत मिळाले होते. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचालीसुद्धा सुरू झाल्या आहेत. मात्र, या फेरबदलात नव्यांना संधी न देता जुन्या पदाधिकाऱ्यांनाच नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

Recommended read: हर हर शंभू गाण्याची सुप्रसिध्द गायिका अभिलिप्सा पांडा येणार चंद्रपूरात

विशेष म्हणजे काही वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान दिलेले नाही. रामेडवार यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे जिल्हापदावरून दूर करीत त्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिले आहे तर चंद्रपुर महानगरात माजी नगरसेवक सचिन भोयर सारखा आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!