चंद्रपूर: चॉकलेटचे आमिष दाखवून एका ५५ वर्षीय इसमाने चार वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दुर्गापूर शहरात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकिस आली. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी कासम अली मियाद अली सय्यद याला अटक केली आहे.

Recommended read: राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित

पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी शेजारी असल्याने एकमेकांना ओळखायचे. याच ओळखीचा फायदा घेवून आरोपीने रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मुलींला चाॅकलेट चे आमिष दाखवून घरी नेले. त्यानंतर बळजबरीने वस्त्र काढून चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुलगी रडत असल्याने आईने विचारपूस केली असता, मुलीने घडलेला प्रसंग सांगितला.

Recommended read: बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू

घटनेची तक्रार दुर्गापूर पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी कासम अली मियाद अली सय्यद यास अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आगलावे करीत आहे.

One thought on “चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार चा प्रयत्न, ५५ वर्षीय आरोपीस अटक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!