चंद्रपूरातील जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर : जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महेशकुमार माळी (40) यांनी सोमवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Recommend read: चिचपल्लीजवळ चारचाकी वाहनाचा भिषण अपघात , सासू सुनेचा जागीच मृत्यू

मागील आठ महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्हा कारागृहातून चंद्रपूर जिल्हा कारागृहात महेश कुमार माळी यांची बदली झाली होती. सोमवारी सायंकाळी ते घरून जेवण करून बाहेर गेले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती होताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.

One thought on “चंद्रपूरातील जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न”
  1. […] चा मुक्त संचार, व्हिडीओ व्हायरल चंद्रपूरातील तुरुंग अधिकाऱ्यांचा आ… विषारी वायूमुळे वेकोलिच्या दोन […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!