काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर तीन इसमांचा जीवघेणा हल्ला

बॅटने मारहाण, घटनेची शहर पोलिसात तक्रार

चंद्रपूर: काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर अज्ञात तीन इसमांनी आझाद गार्डन परिसरात जीवघेणा हल्ला करून क्रिकेट बॅटने बेदम मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान नंदू नागरकर यांनी शहर पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.

Recommended read: वर्धा नदीत बुडून आई मुलाचा मृत्यू

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर हे नेहमीप्रमाणे व्यायाम करून आझाद गार्डन परिसरातील रघुवंशी कॉम्पेलेक्सकडे जात असतांना शासकीय शौचालयाजवळ दुचाकीवरून आलेले तीन हल्लेखाेरांनी नागरकर यांच्या दुचाकीला धडक देत खाली पाडले. त्यानंतर बॅटने अंदाधुंद मारहाण सुरूवात केली. यामध्ये त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. परिसरात नागरिकांनी धाव घेतली असता हल्लेखाेरांनी पळ काढला. दरम्यान नागरकर यांनी शहर पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसासमोर आहे.

येत्या काही महिण्यांवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणूका होवू घातल्या आहे. यातून हल्ला झाला का याचाही शोध पोलिस घेत आहे. नागरकर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

2 thoughts on “काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर तीन इसमांचा जीवघेणा हल्ला”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!