दोघेही गंभीर जखमी, एक संशयित ताब्यात

चंद्रपूर: राजुरा बस स्थानकावर रात्री दहा वाजताच्या सुमारास बामणवाडा गावाकडून येणाऱ्या दोन सख्ख्या भांवडांना पाच-सहा तरुणांनी पाठलाग करून चाकू व अन्य शस्त्रासह जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरूवारी घडली.

यात सास्ती येथील किरण व आकाश कंडे हे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून या प्रकरणी राजुरा पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.

Recommended read: सुन व पोटच्या मुलींने केली आईची हत्या

सास्ती येथील किरण व आकाश कंडे हे सख्खे भाऊ रात्री दहा वाजता बामनवाडा येथून बस स्थानक मार्गे राजुरा येथे येत होते. यावेळी पाच- सहा युवकांनी पाठलाग करीत बस स्थानक परिसरात त्यांना पकडुन चाकू व लाठ्या – काठ्यांनी जोरदार हल्ला चढविला. यावेळी बस स्थानकावर शुकशुकाट असल्याने कुणी मदतीला धावून आले नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र हल्लेखोर पळून गेले होते. या हल्ल्या मागे नेमके काय कारण आहे किंवा जुने वैमनस्य होते काय, याविषयी पोलिस तपास करीत आहेत.

Recommended read: मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेशाला प्रखर विरोध

एका जखमी युवकाला डोक्याला आणि दुसऱ्याला पोटाला जबर मार लागला आहे. अद्याप त्यांची बयाण देण्याची स्थिती नसल्याने प्रकरणाचा अद्याप खुलासा झाला नाही. एका संशयित तरुणाला राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रभारी ठाणेदार दरेकर अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!