शिक्षका कडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकाला अटक

चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील झरी येथील अल्पवयीन मुलगी २७ जून ला रात्री शौचालयाला गेली असता, आरोपींने तिला झुडुपात नेत अत्याचार केला. त्यानंतर तिला दोन मित्रांच्या मदतीने पळवून नेले. दोन दिवसानंतर पिडीत मुलगी गोंडपिपरी येथे सापडली असून तिच्या कुटूंबियांच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून एकाला ताब्यात घेवून चौकशी सुरू आहे.

Recommended read: लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मारोती मुर्लीधर निखाडे (३५), मोबील उर्फ चिट्टू गफार पटेल (२८) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी आरोपींच्या घराशेजारी राहते. दोघामध्ये ओळखी असल्याने पिडीतेशी जवळीक साधली. आरोपी मारोती निखाडे यांने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून फेब्रुवारी २०२२ पासून लैंगिक शोषण करीत होता. घटनेच्या दिवशी २७ जून ला पिडीत मुलगी सायंकाळी शौचालयाला गेली असता, आरोपींने पिडीतेचा पाठलगा करून बळजबरीने झुडुपात नेवून अत्याचार केला.

Recommended read: बिबट घरात शिरल्याने धुमाकूळ

त्यानंतर तिला घरी न जावू देता दोन मित्रांच्या मदतीने तिला चिमूर येथे पळवून नेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन मित्रांच्या सहाय्याने पिडीतेला गोंडपिपरी येथील बसस्थानकात आणून सोडले. पिडीत मुलीच्या कुटूंबियांनी गोंडपिपरी गाठून मुलींला ताब्यात घेवून चिमूर पोलिसांत अत्याचाराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन आरोपींना मारोती मुर्लीधर निखाडे, मोबील उर्फ चिट्टू गफार पटेल या दोघांना अटक केली असून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे. सदरचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉस्टेबल रामचंद्र चापले करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!