बावीस अठरापगड जाती संघटनांचा राजकारण्यांविरूध्द एल्गार

दगड आणि तलवार देण्याऐवजी मुलांच्या हातांना रोजगार द्या

चंद्रपूर: आधी करोनाचे संकट आणि आता महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त असताना राजकर्त्यांनी लोकांनी धीर देणे अपेक्षित होते. पंरतु सत्ताधारी असो कि विरोधक लोकांचे प्रश्न ,समस्या, महागाई, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण याकडे दुर्लक्ष करीत आहे. उलट राजकारण्यांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भविष्यात दंगली होतील. यात सर्वसामान्य कुटुबांची घरे जळतील. त्यांचीच मुले उद्धध्वस्त होतील. हा जीवघेणा खेळ येथेच थांबवा यासाठी जाती संघटनांचा राजकारण्यांविरूध्द एल्गार.

दगड आणि तलवारी देण्याऐवजी आमच्या मुलांच्या हाताला रोजगार द्या, अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अठरापगड जातींच्या तब्बल बावीस संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडे केली.

Recommended read: अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

यांसदर्भात या समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी आज शनिवारला चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. करोनाचे संकट गेले नाही. कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले. लाखो छोट-मोठे उद्योग बंद पडले. आता कुठे पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महागाई, इंधनाचे दर गणनाला भिडले आहे. दुसरीकडे धार्मीक दंगली आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहे. यात बहुजन समाजातील मुलांचाच वापर होतो. आजवरच्या अनेक दंगलीत हीच वस्तुस्थिती समोर आली आहे. आमच्या मुलांचा अशा पद्धतीने होणारा वापर चिंतेची बाब आहे. मात्र,यापुढे आम्ही बहुजन समाजातील मुलांचा दंगलीसाठी वापर होवू देणार नाही, असेही या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

राजकीय हेतू साध्य झाल्यावर त्यांना सोडविण्यासाठी कोणी पुढे येत नाही. आईवडिलांनाच आपल्या मुलांसाठी कचेरी आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. यात त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. कुटुंबालाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन त्यांनी केली.

Recommended read: गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन

समाजातील तरुणांच्या वेगळ्या समस्या आहेत. शिक्षा, आरोग्य, रोजगार, महागाई या खऱ्या समस्या आहेत. त्या दूर करण्याची आज खरी गरज आहे. आपल्या पक्षावर. नेत्यांवर प्रेम करा. परंतु त्यांनी सांगितले म्हणून आपल्या घरादाराची रांगोळी होईल, असे कोणतेही कृत्य करु नका, अशी विनंती या प्रतिनिधींनी यावेळी केली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धध्व ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संघटनांकडून निवेदन पाठविला जाणार आहे.

पत्रपरिषदेला डॉ. राकेश गावतुरे, डॉ. सचिन भेदे. डॉ. राजू तोटेवार, आनंदराव अंगलावर, विजय मुसळे, अर्जुन आवारी, अविनाश आंबेकर, अॅड. प्रशांत सोनुले, राजु सिडाम, विकास शेंडे यांच्यासह बावीस संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.२२ समाज संघटनांचा पाठींबाकुणबी समाज मंडळ, अखिल भारतीय माळी महासंघ, तैलिक महासंघ. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज, बेलदार समाज, व्हीजेएनटी वेलफेअर असोसिएशन, गाडी लोहार समाज, भोई समाज, गांडली समाज, आदिवास समाज, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र प्रदेश गोलाकर समजा, नाभिक समाज, फ्रान्सिस ख्रिस्ती समाज, गोवारी समाज, अखिल भारतीय मातंग समाज, भाट समाज , सुतार समाज, मातंग समाज, आदिवासी माना समाज, विदर्भ बारई समाज, झाडे कुणबी समाज, भावसार समाज, धोबी समाज, शिंपी समाज, कलार समाज या जाती संघटनांचा राजकारण्यांविरूद्ध एल्गार या निवेदनाद्वर स्वाक्षरी केली आहे.

One thought on “बावीस अठरापगड जाती संघटनांचा राजकारण्यांविरूध्द एल्गार”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!