मनसे महिला शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता यांचा इशारा

चंद्रपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( मनसे ) अध्यक्ष राजसाहेब ठाकरे चंद्रपुर दौऱ्यावर असतांना आमचे काही राजकीय विरोधक व एका पत्रकाराने या लोकांना एकत्र करून कलकाम कंपनीचे एजंट यांना पाठीमागून मार्गदर्शन करून राज ठाकरे यांच्यासमोर आमच्या नावाची नारेबाजी करत आमची बदनामी केली.

Recommended read: राज्य सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत

कोणत्या पुराव्याच्या आधारावर आमची बदनामी करीत आहे गुंड म्हणत आहे हे त्यांनी सांगावे व दोन दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही या विरोधात न्यायालयात जावून मानहाणीचा दावा ठोकू असे असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकुर, वाहतूक सेना अध्यक्ष भरत गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!