ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रप्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत ४ हजार ९१८ वन्यप्राण्यांची नोंद

ताडोबा कोर व बफर क्षेत्रात ४४ वाघ व ११ बिबट्यांची नोंद

चंद्रपूर :ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोमवार १६ मे बुध्दपोर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेत ४४ पट्टेदार वाघ, ११ बिबट्यांसह एकूण ४ हजार ९१८ वन्यप्राण्यांची नोंद प्रगणकांनी घेतली, ताडोबाच्या कोर व बफर क्षेत्रातील ९८ मचांनींवरून दोन प्रगणक व गाईडला बसविण्यात आले होते. त्यांनी चंद्राच्या प्रकाशात या वन्यप्राण्यांची नोंद घेतली आहे.

Recommended read: विज्ञाननिष्ठ बूध्द धम्म जगाची गरज- गमतीदास फुलझेले

करोना संकटामुळे दरवर्षी बौध्दपोर्णिमेला होणारी प्राणीगणना दोन वर्ष झाली नाही. दोन वर्षाचे विश्रांतीनंतर काल सोमवार १६ मे रोजी ताडोबाच्या बफर व कोर अशा दोन्ही क्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना चंद्रप्रकाशात केली गेली.

ताडोबाच्या बफर व कोर क्षेत्रात एकूण ९८ मचानींवर प्रत्येकी दोन प्रगणक व एक गाईड असे तीन जणांना बसविण्यात आले होते. त्यांच्या हातात कागद, पेन तथा इतर साहित्य देण्यात आले होते. सकाळी आठ ते दुसरे दिवशी सकाळी आठ या वेळात ही प्राणीगणना करण्यात आली.

त्यानुसार वाघ कोर क्षेत्रात २३, बफर क्षेत्रात २१ असे एकूण ४४ वाघांची नोंद घेण्यात आली. बिबट कोर ४, बफर ७, एकूण ११, जंगली कुत्रे कोर ९, बफर २७, अस्वल कोर ८, बफर १४, एकूण २२, गवा कोर क्षेत्रात १२५, बफर २०० असे एकूण ३२५, हरीण कोर ८५९, बफर क्षेत्रात ३५० असे एकूण १२०९, सांबर कोर ६४९, बफर २९३ एकूण ९४२, बारकिंग डिअर कोर मध्ये ७८ तर बफर मध्ये ६४ असे एकूण १४२, चौशिंगा कोर ४, बफर ६ एकूण १०, रानडुकर कोर ५८९, बफर ६८० असे एकूण १२६९, निलगाय कोर ४५, बफर ६७, एकूण ११२, लंगुर कोर १८१, बफर २८७, एकूण ४६८, रानमांजर कोर ९, बफर १५, एकूण २४, भारतीय प्रजातीचे मांजर कोर ४, बफर २ एकूण ६, जंगली मांजर कोर ३, बफर ४, मोर कोर १५६, बफर ८९, एकूण २४६, मुंगूस कोर २५, बफर १२ एकूण ३७ असे एकूण ४ हजार ९१८ प्राणी प्रगणकांनी नोंद घेतली आहे अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

2 thoughts on “ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चंद्रप्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत ४ हजार ९१८ वन्यप्राण्यांची नोंद”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!