आनंद नागरी बँक : घर एकाचं, कर्ज दिलं दुसऱ्यांला

आनंद नागरी बँक : महिलेचा तूफान राडा, व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर: येथील आनंद नागरी बँक ने घर एकाच्या नावाने असतांना कर्ज दुसऱ्यांच महिलेला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेच्या घरी तब्बल चाळीस लाखांचे कर्ज असल्याची नोटीस धडकल्याने कुटुंबाला धक्काच बसला.

Recommended read: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

दरम्यान, महिलेने चक्क बँकेचे कार्यालय गाठत कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिलेने बँकेत राडा घातला. व्यवस्थापकासमोरच राडा केल्याचा व्हिव्डीओ समोर आला आहे.

आनंद नागरी बँक मध्ये महिलेचा राडा

येथील मुख्य मार्गावर आनंद नागरी सहकारी बँकेचे कार्यालय आहे. बँकेने घर एकाच्या नावावर असतांना कर्ज दुसऱ्यांच महिलेला दिले. बँकेने दीपक भास्कर मुदलीवार व त्यांच्या पत्नीला नोटीस पाठवून कर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे कर्ज न उचलता ४० लाखाचे कर्ज बघून महिलेचा पाराच भडकला. तिने थेट बँकेचं कार्यालय गाठून कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, समाधानकारक उत्तर न मिळाले नाही. त्यामुळे महिलेने बँकेत तूफान राडा केला.

Recommended read: आपली नोकरी लोकांच्या सेवेसाठीच – तत्कालीन जिल्हाधिकारी गुल्हाने

मह या दरम्यान बँकेशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!