डायगव्हाणे

अमृतमहोत्सवी जिल्हास्तरीय वार्षिक अधिवेशन

लोकसत्ता,वार्ताहर

चंद्रपूर: विद्यार्थी, शिक्षक-पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात लढवय्या नेतृत्वाची गरज आहे. मागील दहा वर्षांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर व शैक्षणिक धोरणावर बोलणारा शिक्षकांचा प्रतिनिधी सभागृहात नसल्याची खंत आहे. येणाऱ्या निवडणुकीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना सभागृहात भरघोस मताने निवडून पाठवण्याचे आवाहन माजी शिक्षक आमदार विश्‍वनाथ डायगव्हाणे यांनी केले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमृतमहोत्सवी जिल्हास्तरीय वार्षिक अधिवेशन रविवारी २७ जानेवारीला जिजाऊ सभागृहात पार पडले. त्याप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे होते. याप्रसंगी सरकार्यवाह सुधाकर अडबाले, मधुकर चाफले, प्रा. राजेंद्र खाडे, जगदिश जुनघरी, रमेश काकडे, श्रीधर खेडीकर, जयप्रकाश धोटे, अविनाश बढे, गजानन गावंडे, केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे यांची उपस्थिती होती.

Recommended read: काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर तीन इसमांचा जीवघेणा हल्ला

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक, माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाने यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. डोनेट कार्ड या संस्थेचे संस्थापक फोर्ब्स यादीमध्ये समाविष्ट झालेल्या सारंग बोबडे यांचाही सत्कार करण्यात आला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे यांनी केले. अहवाल वाचन कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीने केलेल्या प्रमुख आंदोलनाचा आढावा श्रीहरी शेंडे यांनी घेतला. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर अधिवेशनात चर्चा करण्यात आली.

आयोजनासाठी केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, लक्ष्मणराव धोबे, दिगांबर कुरेकार, सुनील शेरकी, गंगाधर कुनघाडकर, नामदेव ठेंगणे, अनिल कंठीवार, नितीन जीवतोडे, शालीक ढोरे, मनोज वासाडे, दीपक धोपटे, मंजुशा धाईत, सोनाली दांडेकर, अतिक कुरेशी, वसुधा रायपुरे, मारोतराव अतकरे, प्रमोद कोंडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, गुरूदास चौधरी, सचिन तपासे, रामदास आलेवार, धनंजय राऊत, रंजना किन्नाके, प्रा. सोनकुसरे यांनी सहकार्य केले. संचालन राजेंद्र बल्की, सुरेखा मोरे यांनी, तर आभार दिगंबर कुरेकर यांनी मानले.

One thought on “विमाशिसं उमेदवार सभागृहात पाठवा माजी आमदार डायगव्हाणे यांचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!