अकबर ,औरंगजेबाची चांदीची नाणी चंद्रपुरात सापडली

अकबर , औरंगजेबाचा चांदीची नाण्यांवर नेमका काय कोरल्या ?

चंद्रपूर : जिल्हातील वटराणा येथे शोषखड्डा खोदतांना दोन चांदीची नाणी सापडली. या नाण्यावर फारसी भाषेत कलमा कोरल्या आहेत.ही नाणी मुगल बादशहा आकबर आणि औरंगजेबाचे आहेत. नाण्यांचा काळ पंधरा आणि सोळावे शतक आहे.

ही नाणी गोंडपिपरी तालुक्यातील नितेश मेश्राम यांना शोष खड्डा खोदतांना सापडली आहे.त्याने ही नाणी जपून ठेवली आहे.या नाण्यांनी चंद्रपूरचा इतिहासात अधिक भर टाकली आहे.

Recommended read: वनमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला

चंद्रपूर जिल्हाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंडराजांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत अनेक वास्तु उभ्या आहेत. चंद्रपूरचा इतिहासात भर टाकणारी घटना गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा येथून पुढे आली आहे. वटराणा येथिल नितेश मेश्राम यांना शोषखड्यासाठी खोदकाम करतांना दोन चांदीची नाणी सापडली आहे. ही नाणी चांदीची असून वजन 11 ग्रम आहे. या नाण्यावर फारसी भाषेत कलमा लिहील्या आहेत.

मेश्राम यांनी ही नाणी जपून ठेवली आहेत. मेश्राम यांनी इतिहास प्रेमी निलेश झाडे यांना ही नाणी दाखवलित. झाडे यांनी इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला.फारसी भाषेत लिहीलेल्या कलमांचे अशोक सिंह ठाकूर यांनी वाचन केलेत. ही नाणी मुगल बादशहा अकबर आणि औरंगजेबाची असल्याचे त्यांनी सांगितले.

Recommended read: बार्टी प्रमाणे महाज्योतीमध्ये ओबीसींच्याच संस्थांना प्राधान्य देण्यात यावे- राजूरकर

गोंडपिपरी तालुका हा मुगलांचा ताब्यात होता. वटराणा येथे त्या काळात मोठी वसाहत असावी.या भागात संशोधन झाल्यास मुगल काळातील इतिसावर प्रकास पडू शकतो,अशी शक्यता इतिहासकारांनी वर्तविली आहे.

काय आहे लिहीलेलं….

गोलाकार आसलेला चांदीचे नाणी :- औरंगजेबाचे आहे.

या नाण्यावर फारसी भाषेत ” सिक्का ज़द दर जहान चु बद्रे मुनिर. शाह औरंगजेब आलम गिर.
हिजरी सन 1111
” लिहीलं आहे.

चौकोणी नाणे :- अकबर चे आहे.

त्यावर अकबराचे नाव कोरले आहे. हिजरी सन 993 लिहीले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!