कृषी केंद्र विक्री परवाना अद्ययावत करण्यासाठी घेतली लाच

चंद्रपूर: कृषी केंद्र विक्री परवाना अद्ययावत करून देण्याच्या कामकरीता १० हजार रूपयांची लाचेची मागणी करून एका खाजगी इसमामार्फत स्विकारल्याप्रकरणी कृषी सहाय्यकास अटक.

जया विजय व्यवहारे, कृषी सहाय्यक व खाजगी इसम गणपती कम्युनीकेशन व झेरॉक्सचे संचालक वैभव विजय धोटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

Recommended read:पोराच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून बापाने केला खून

तक्रारदार हे राजुरा तालुक्यातील रहिवासी असून तकारदार यांचे आपले सरकार पोर्टल या प्रणालीवर जुने ४ कृषी केंद्र विक्री परवाने अद्ययावत करुन, १ नविन परवाना काढुन व सर्व कृषी केंद्र परवाने स्थालांतर करुन देण्याच्या कामाकरीता कृषी अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक विजय व्यवहारे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रूपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने लाचेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कृषी सहायक जया व्यवहारे यांच्या मागणीनुसार राजुरा येथील वैभव विजय धोटे (गनपती कम्युनीकेशन आणि झेरॉक्स सेंटर) या खाजगी इसम यांचे मार्फतीने लाचरक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Recommended read: चंद्रपुरातील शाळकरी मुलाने रचला स्वत:च्याच अपहरण चा बनाव

तसेच जया विजय व्यवहारे यांना कृषी अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. कृषी सहाय्यकास अटक ची कारवाई चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!