सावली : संरक्षण भिंत ओलांडून बिबट चक्क घरात घुसल्याची घटना सावली वनपरिक्षेत्रात येणाऱ्या पाथरी येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान सावली येथील विभागाच्या चमूने तीन तास रेस्क्यू ऑपरेशन करून त्या बिबट्याला जेरबंद केले.

Recommanded read: शिवसेना ‘ॲक्शन’ मोडमध्ये

पाथरी येथील गोपाळ पाटील ठीकरे यांच्या घरामागे मोठे जंगल आहे. गुरुवारी त्यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक बिबट्याने संरक्षण भिंत लावून घरात प्रवेश केला. घरात बिबट्या घुसल्याची माहिती होताच त्यांची मोठी तारांबळ उडाली. मिळेल त्या वाटेने ते घराबाहेर पडले. बिबट घरात घुसल्याची गोष्ट गावात वार्‍यासारखी पसरली. बिबट्याला बघण्यासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान सावली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तसेच पाथरी पोलिस स्टेशनच्या पथकाला या बाबत माहिती देण्यात आली.

पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश मोहोळ व सावली येथील वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी कांबळी व त्यांची चमू ठिकरे यांच्या घरी दाखल झाले.त्यानंतर घरातील सर्व मार्ग बंद करून एका मार्गावर पिंजरा लावून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर तो बिबट जे्रबंद करण्यात वन विभागाला यश आले. तेव्हाच गावाकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी कांबळी डिएमओ प्रशांत खाडे, यांच्या मार्गदर्शनात, डॉक्टर पुचडवार, सावली येथील व्याघ्र दलाचे, वन्यजीव संरक्षक उमेश झिरे उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाथरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश मोहोळ व त्यांची चमू उपस्थित होती.

2 thoughts on “बिबट घरात शिरल्याने धुमाकूळ, अखेर तीन तासाच्या थरारानंतर तो बिबट जेरबंद”
  1. […] जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बिबट घरात शिरल्याने धुमाकूळ, अखेर ती… शिवसेना ‘ॲक्शन’ मोडमध्ये, बंडखोर […]

  2. […] जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बिबट घरात शिरल्याने धुमाकूळ, अखेर ती… शिवसेना ‘ॲक्शन’ मोडमध्ये, बंडखोर […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!