देशी कट्टा व पिस्टल शस्त्रासह आरोपीला अटक

बिहार मधुन देशी कट्टा आणल्याची प्राथमिक माहिती

चंद्रपूर: राजुरा शहरातील सोमनाथपुर वार्डात शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच घराची झाडाझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल, एक देशी कट्टा, एक स्टील तलवार व चक्र असलेला घातक रॉड आढळून आला.

यातील काही शस्त्र पानठेल्यावर लपवून ठेवली होती. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून काही विधिसंघर्ष बालक असल्याची माहिती आहे. शहरात शस्त्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

Recommended read: महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

दिनांक २५ जुलै ला राजुरा पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना शस्त्रसाठाची गुप्त माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी घराभोवती सापळा रचून तपासणी केली असता त्यात घातक शस्त्रे आढळून आली. यात स्टीलची तलवार, पिस्टल लायटर, देशी कट्टा व चक्र असलेले हत्याराचा समावेश आहे. यातील काही शस्त्र पानठेल्यावर लपवून ठेवली होती.

पोलिसांनी शस्त्र जप्त करून लावजोतसिंग हरदेव सिंग देवल (१८) या आरोपींला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरोधात 3,4,25 आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी काही विधिसंघर्ष बालक असल्याची माहिती आहे.

Recommended read: पत्नीला पळवून नेल्याच्या रागात पतीने युवकाचा वडीलांचा केली निघृण हत्या

या आरोपींनी बिहार राज्यातून शस्त्र आणल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी घातक शस्त्र का आणली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही.दरेकर,पोलीस उप निरीक्षक हिराचंद गव्हारे, नागोराव भेंडेकर, संदीप बुरडकर, रामा भिंगेवाड हे अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!