नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात

नागपूर-चंद्रपूर महामार्ग : अज्ञात वाहन वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

चंद्रपूर: नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील मजरा या गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी आठ वाजता दरम्यान घडली. अरुण शामराव चाफले (३०), गोलू इंद्रजीत फुलझले (३२) असे मृतकांचे नाव आहे.

Recommended read: लॉजवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे

अरुण शामराव चाफले आणि गोलू इंद्रजीत फुलझले हे दोघेही आपल्या दुचाकी वाहनाने वरोरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मजरा या गावी जात होते. मजरा येथे जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. धडक इतकी जबर होती कि, घटनास्थळीच दोघांचाही मृत्यू झाला.

Recommended read: आवळगावात धुमाकूळ घालणारा K-4 वाघ जेरबंद

घटनेची माहिती पोलिसांना मिळतात दोघांनाही वरोर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वरोरा पोलीसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!