गोंडपिपरीत सुरजागड लोहप्रल्पाच्या ट्रकने तीन जणांना चिरडले

गोंडपिपरीत सुरजागड लोहप्रल्पाच्या ट्रकने तीन जणांना चिरडले

चंद्रपूर: सुरजागड लोहप्रकल्पात जाणाऱ्या ट्रकने गोंडपिपरी येथील संदीप हॉटेल समोर उभ्या असलेल्या ऑटो, सात दुचाकी व एका सायकलस्वारांस धडक दिल्याची घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. गोंडपिपरीत भिषण अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहे.

Recommended read: सूरजागड लोहखाणीतील ट्रक चालकाचा आदिवासी महिलेवर बलात्कार

गडचिरोलीतील सुरजागड लोहप्रकल्प उठला नागरिकांच्या जिवावर

गोंडपिपरी राज्य महामार्गावरून सुरजागड लोह प्रकल्प कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवाने आँटो, सायकलस्वारासह सहा ते सात दुचाकींना उडविले. अपघातात गोंडपिपरी येथील धनराज झाडे, माया झाडे व सोमनपल्ली येथील प्रकाश चुधरी गंभीर जखमी झाले. घटनास्थळी तहसीलदार के डी मेश्राम, ठाणेदार जिवन राजगूरू दाखल होत जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. सुरजागड प्रकल्प गोंडपिपरी तालुक्यातील मुख्य मार्गावरील नागरिकांसाठी जिवघेणा ठरत आहे.

Recommended read: खासदार बाळू धानोरकर यांनी दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन

पंधरा दिवसापूर्वी झाला होता अपघात

पंधरा दिवसापुर्वी सुरजागड लोकप्रकल्पाकडे जाणारा ट्रक घरात घुसला होता. या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले होते. यात वाहनचालकाचा मृत्यू झाला. वारंवार होत असलेल्या अपघातामुळे नागरिकांत कमालीची धास्ती पसरली आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना होण अपेक्षित आहे.

By Amol Ghugul

Founder IG Media Chandrapur Sub Editor - Omkar Wandhare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!