ब्रम्हपुरी सेक्स रॅकेट प्रकरण

ब्रम्हपुरी: शहरातील बहुचर्चित सेक्स रॅकेट, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात ब्रम्हपुरी पोलिसांनी तपासामध्ये आतापर्यंत एकूण नऊ लोकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अटक केली.

अटकमध्ये ब्रम्हपुरी दोन, लाखांदूर तीन तर वडसा येथील चार आरोपींनचा समावेश असल्याची माहिती ब्रम्हपुरी पोलिस निरीक्षक रोशन यादव यांनी आज दिनाक 26 ला पत्रकारांसोबत बोलताना दिली.

Recommended read: हर हर शंभू गाण्याची सुप्रसिध्द गायिका अभिलिप्सा पांडा येणार चंद्रपूरात

ब्रम्हपुरी शहरात बाहेरुन मुली आणून त्यांच्या कडून देह व्यापार केलं जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार काही दिवसापूर्वी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कलकत्ता येथून अपहरण झालेली एक अल्पवयीन मुलगी ही ब्रम्हपुरीला असून विदर्भ इस्टेट कॉलनीत एक दोन दिवसापूर्वी किरायचे घर घेऊन राहणारे लोणारे दाम्पत्य तिच्या कडून देहविक्री करत असल्याचे प्राप्त सूचनेवरून दिनाक 17 ला पोलिसांनी सापडा रचून त्या अल्पवयीन मुलीची लोणारे दाम्पत्य चे तावडीतून सुटका करून घेतली होती .

Recommended read: एकाच कुटुंबातील चौघांचा सामूहिक आत्महत्याचा प्रयत्न

नागपूर येथील एका सामाजिक संस्था च्या तक्रारी वर ब्रम्हपुरी पोलिसांनी मानव तस्करी अधीनियम,पोस्को, पिटा ॲक्ट अंतर्गत नोद करून मुख्य आरोपी मंजित रामचंद्र लोणारे वय 40 व चंदा मंजीत लोणारे वय 32 यांना अटक केली.

अत्याचार प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपी अटक

सदर प्रकरणात ब्रम्हपुरी पोलिसांनी मुख्य आरोपींचा पोलिस कोठडी घेऊन माहिती घेतली सदर माहितीचे आधारावर वडसा येथील

अरविंद इंदूरकर वय 47

शिवराम हाके वय 40

राजकुमार उंदिरवाडे वय 42

मुकेश बुराडे वय 28 तर

लाखांदूर येथील प्रकाश परशुरामकर वय 35

सौरभ बोरकर वय 22

गौरव हरिणखेडे वय 28

या लोकांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणात अटक केली आहे.

Recommended read: बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई साठी तालाठीकडे बँक खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन

सदर प्रकरणात सर्व आरोपीवर पास्को, पिटा या कलमासह 376,376(3) या कलमाची वाढ केली आहे. सद्या सर्व नऊ आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून प्राप्त माहिती नुसार तपास सुरू राहील अशी माहिती पोलिस निरीक्षक रोशन यादव यांनी पत्रकारांना दिली.

सदर प्रकरणात पुढे काय कार्यवाही होते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!