दिव्यांग मुलीवर अत्याचार : आरोपींला अटक

चंद्रपूर: घुग्घुस शहरात दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. सदर घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Recommended read: वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच अतिक्रमित शेतकऱ्यावर वनविभागाची मुजोरी

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमराई वॉर्डात राहणारा आरोपी विकास चटकी हा काल 1 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका अपंग मुलीच्या घरी गेला आणि तिच्यासोबत गैरवर्तन केल्याबाबतची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विकास याला कलम 354 अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. आज पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Recommended read: सुंगधित तंबाखू पुरवठादारांवर मोक्का लावणार – मंत्री संजय राठोड

आरोपी विकास चटकी याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!