चंद्रपूर: हर हर शंभू या प्रसिध्द गाण्याची सुप्रसिध्द गायिका अभिलिप्सा पांडा आणि सुप्रसिध्द देवी जागरणकार अजित मिनोचा हे माता महाकाली महोत्सवात सहभाग घेणार आहे.

Recommended read: आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात आयोजित होणार भव्य माता महाकाली महोत्सव

१ ऑक्टोंबरला देवी जागरणकार अजित मिनोचा यांचे जागरण तर २ ऑक्टोंबरला निघणारा माता महकाली नगर प्रदक्षिणेत गायिका अभिलिप्सा पांडा यांचा रोड शो असणार असल्याची माहिती माता महाकाली सेवा समीतीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

१ ऑक्टोंबर पासुन चंद्रपूरातील महाकाली मंदिर पटागंणात आयोजित माता महाकाली महोत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. ४ ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या महाकाली महोत्सवाला महाकाली भक्तांचा मोठा सहभाग लाभत आहे.

Recommended read: घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा

१ ऑक्टोंबरला शनीवारी सायंकाळी जबलपूर मध्यप्रदेश मधील सुप्रसिध्द देवी गीत जागरणकार अजित मिनोचा यांचा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या सोबत ईशांत मिनोचा हे ही देवी गीतांचे सादरीकरण करणार आहे.

गायिका अभिलिप्सा पांडा यांचा संचासह रोडशो

तर २ ऑक्टोंबरला आयोजित श्री. माता महाकाली नगर प्रदक्षिणेत समाज माध्यमांवर धमाल माजवत असलेल्या हर हर शंभू या गाण्याची ओडीसा येथील गायिका अभिलिप्सा पांडा आपल्या संचासह रोडशो मध्ये सहभागी होणार आहे.

Recommended read: बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई साठी तालाठीकडे बँक खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन

सदर कार्यक्रमाला महाकाली भक्तांसह चंद्रपूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!