कोरपनाचा तरूण झाला नायब तहसीलदार

ओबीसी प्रवर्गातून राज्यातून दहावा

कोरपनाच्या तरूणांने एमपीएससीत मिळविले घवघवीत यश

चंद्रपूर: जिद्द ,चिकाटी, हुशारी असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट ही शक्य करू शकते. कोरपना तालुक्यातील एका युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ( एमपीएससी ) यश संपादन केले असून नायब तहसीलदार पदी त्यांची वर्णी लागली असून तो ओबीसी प्रवर्गातून राज्यातून दहावा आला आहे. यामुळे कोरपना शहराचे उंचावले आहे.

Recommended read: २५ लाखाचा सुंगधित तंबाखू जप्त, आठ जणांना अटक

गिरीश उर्फ प्रतीक गजाननराव बोरडे असे त्या युवकांचे नाव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नायब तहसीलदार पदाच्या परीक्षेत त्याने ओबीसी प्रवर्गातून राज्यातून दहावा क्रमांक पटकावला आहे. गेल्या चार वर्षापासून जळगाव व करोणा काळानंतर कोरपना येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिशन सेवा अभ्यासिकेत अभ्यास करून अभ्यासिकेतून पहिला अधिकारी होण्याचा मान त्याला मिळाला आहे.

अतिशय कार्य उत्साही, शांत, संयमी, प्रेमळ, स्वभावाचा धनी असलेल्या प्रतीकचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरपना, माध्यमिक वसंतराव नाईक विद्यालय, उच्च माध्यमिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर तर पदवीचे शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथून पूर्ण केले आहे. प्रतिकने कठोर मेहनत व अथक परिश्रमातून हे यश मिळवले आहे.

Recommended read: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

त्याचे वडील गजाननराव बोरडे हे स्थानिक वसंतराव नाईक विद्यालयाचे संस्थापक संचालक व प्राचार्य होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, बहीण व आप्तेष्टांना दिले आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तालुक्याचे स्थान असलेल्या कोरपना शहरातून पहिला नायब तहसीलदार होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

One thought on “कोरपनाचा तरूण झाला नायब तहसीलदार”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!