गणपती विसर्जन साठी गेलेला ट्रक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू

सहा जण गंभीर तर, ३५ किळकोळ जखमी
गणपती विसर्जन नंतर भक्तावर काळाचा घात

चिमूर तालुक्यातील काजळसर येथील दुर्दैवी घटना

चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या काजळसर येथे मस्कऱ्या गणपती विसर्जन नंतर ट्रकटरने परत येत असलेल्या गणेशभक्तावर काळाने घाला घातला. गावाशेजारील जंगल नाक्याजवळ ट्रकटरची ट्राली उलटून भीषण अपघात झाला.

Recommended read: अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याची जमावाने केली हत्या

यात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहे. तर ३५ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये शालेय मुलांमुलींचा समावेश आहे. प्रेमीला गुलाब श्रीरामे (४५) असे मृतक महिलेचे नाव आहे.

Recommended read: पेट्रोलियम मंत्र्याचे रिफायनरी वरून चोवीस तासातच घूमजाव

घटनेत जखमींना अनेकांना डोक्याला हाताला पायाला मार असून काहींचे पाय हात तुटले आहे तर काहींना छातीला जबर मार लागला आहे सदर घटनेने काजळसर गावात एकच हाहाकार माजला असून गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास चिमूर पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!