ट्रक चालकाचा घटनास्थळी मृत्यू

चंद्रपूर: चंद्रपूर मार्गे गोंडपपिपरीवरून सुरजागडला जाणारा ट्रक गोंडपिपरी शहरातील बंडू बळीराम बांगरे यांच्या घरात घुसल्याची घटना शुक्रवारी (दि.१६) दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.

Recommended read: मंत्र्यांसह व १६० कुटुंबियांना धनादेशासाठी ३ तास वाट पाहायला लावणे घुग्घुस नगर परिषद मुख्याधिकारी यांना भोवले

ही गाडी पंकज जैन यांच्या मालकीची आहे. या भीषण अपघातात घराची ५ लाखांची नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उतरप्रदेश राज्यातील असणाऱ्या चालकाचा रामनवल बेनी उपाध्याय वय (५५) रा.उतवलीया ता-बासगाव जि-गोरखपूर याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

यावेळी रस्त्यावरच्या दुचाकीचा चुराडा झाला. माहिती मिळताच घटनास्थळी ठाणेदार जीवन राजगुरू, पीएसआय पटले यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परिस्थिती हाताळली.

Recommended read: शिवीगाळ, मारहाणप्रकरणी पुगलिया बंधूंसह १२ जणांवर गुन्हे

या दरम्यान एका बाजूने तब्बल चार ते पाच तास वाहतूक बंद करन्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!