गडचिरोली: मैत्रिणीसह जंगलात फिरण्यासाठी गेलेल्या युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर-उसेगाव रस्त्यावरील जंगलात घडली. अजय सोमेश्वर नाकाडे (२४) असे मृत युवकाचे नाव असून तो चोप (कोरेगाव) येथील रहिवाशी आहे.

Recommended read: चेकलिखितवाड्यात भिषण आग, तीन घरे जळून खाक

अजय नाकाडे हा मैत्रिण व एका मित्रासोबत फिरण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील उसेगाव जंगल परिसरात गेले होते. जंगलात फिरत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने अजय नाकाडे यांच्यावर हल्ला चढविला. अजय नाकाडे यास वाघाने फरफटत जंगलात घेऊन गेले. सदरची बाब मित्राच्या लक्षात येताच त्यांनी उसेगाव गाठून घटनेची माहिती दिली. पोलिस व वन विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. सदर परिसरात वाघ फिरत असताना युवक जंगलात कशासाठी गेले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

One thought on “मैत्रिणीसोबत जंगलात फिरण्यासाठी गेलेल्या युवकावर वाघाचा हल्ला”
  1. […] आरक्षण रद्द – सचिन राजुरकर मैत्रिणीसोबत जंगलात फिरण्यासाठी गे… चेकलिखितवाड्यात भिषण आग, तीन घरे […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!