भीषण अपघात : चार जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

चंद्रपूर: चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे मध्यरात्री च्या सुमारास बोलेरो वाहनाचा भीषण अपघात झाल्याने चार जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे.

गडचिरोली येथील प्रसिद्ध डिजे वादक पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अनुप ताडुलवार या आपल्या मित्रासोबत चंद्रपूर येथे डिजे च्या काही साहित्य खरेदी साठी आले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत अनुप वी पत्नी व साळा ही सोबत होता.

Recommended read: शेतमजूर बैल धूत असताना वाघाचा हल्ला

साहीत्य खरेदी करून परत गावाकडे येत असतानाच सावली तालुक्यातील किसानगर येथे मुख्य मार्गावर गाय बसलेली होती तिला वाचविण्यासाठी कट मारत असताना स्टेरिंग राळ तुटला आणि गाडी उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला. त्यानंतर किसानगर व व्याहड खुर्द येथील नागरिकांनी सावली पोलिसांना माहिती दिली.

सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे घटनास्थळी दाखल होत तेथील स्थानिकांची मदत घेत त्या अपघातग्रस्ताना बाहेर काढले. व तेथील मृतकांना व जखमी ला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.

Recommended read: गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीला आंंतरराष्ट्रीय पुरस्कार

या अपघातात पंकज किशोर बागडे (26) रा. गडचिरोली, अनुप रमेश ताडूलवार (35) वर्ष रा. विहीरगाव ता. सावली, महेश्वरी अनुप ताडूलवार (24) वर्ष रा. विहीरगाव, मनोज अजय तीर्थगिरीवार (29)रा. ताडगाव ता.भामरागड जिल्हा गडचिरोली यांचा मृत्यू झाला तर सुरेंद्र हरेंद्र मसराम (23) रा. चिखली ता. सावली जिल्हा चंद्रपूर हे जखमी झालेले आहे अपघाताचा तपास सावली पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!