गोंडपिपरी: पंधर दिवसापासून थैमान घातलेल्या पावसाने हिवरा गावासह संपूर्ण परिसरात नदी नाल्यांना पूर आला. नदी काठावरील असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी येऊन संपूर्ण शेतीचे नुकसान झाले. दोन दिवसापासून पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून उतरणे सुरू झाले.

हिवरा गावातील शेतकरी रवींद्र चोथले यांची संपूर्ण शेती पुराच्या पाण्याने बुडालेली होती. दोन दिवसापासून शेतात आलेले पुराचे पाणी उतरत असताना आज मात्र त्यांच्या शेत जमिनीवर काही विशिष्ट भागात उकडीचा उद्रेक होताना दिसला. हे बघून एक वेगळच आश्चर्य निर्माण झालेल आहे.

असं कधीच बघितलं नसल्याने पहिल्यांदा झालेलं असल्यामुळे …………………. “”पूर उतरला..!! पण काही विशिष्ट जागेत उद्रेक करून गेला…!!””” अशी समज निर्माण झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!