पेट्रोल पंपाला आग लागल्याने पेट्रोल पंप जळून खाक

चंद्रपूर:बल्लारपूर तालुक्यातील कोठारी मार्गावरील बल्लारपूर पेपर मिल प्रशासनाच्या लाकूड डेपो ला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग पसरत गेल्याने बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाला लागून पेट्रोल पंप जळून खाक झाले आहे.

Recommended read: डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात

पेट्रोल पंपाला भीषण आग लागून खाक

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बल्लारपूर नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन व पेपर मिल व वन विभागाचे वाहनांने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.जिल्ह्यात सतत आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बल्लारपूर पेपर मिल चे लाकूड गोडाऊन आहे. या गोडाऊनला दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड जळून खाक झाले आहे. सदर लाकूड डेपोच्या बाजूला पेट्रोल पंप आहे, आगीने भीषण रूप धारण करीत बाजूलाच असलेल्या पेट्रोल पंपाला जाऊन आग लागली. पेट्रोल पंपाला आग लागल्याने एकच भडका उडाला होता. दरम्यान आगीची भीषणता लक्षात घेता तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. वृत्त लिहिस्तोवर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते.

One thought on “कळमना येथील पेपर मिलच्या लाकूड डेपोला व बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाला भीषण आग”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!