आकाशातून पडलेला धुमकेतू कि सॅटेलाइटचा तुकडा?- IG Media Chandrapur

जिल्हा प्रशासनाने सत्यता पडताळणी करणे आवश्यक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयात धूमकेतू सारखा आकाशातून ग्रह पडल्याची चर्चा रंगली असून त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आकाशातून पडलेला धुमकेतू कि सॅटेलाइटचा तुकडा?

Recommended read: अवकाशातून पडलेली वस्तू सॕटेलाईटची मोठी रिंग

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, धाबा, हिवरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी, राजुरा या परिसरात पडल्याची माहिती आहे.

Satellite or commet

आकाशातून सॅटेलाइटचे तुकडे पडल्याचे बोलले जात आहे. आकाशातून पडलेली नेमकी वस्तू काय आहे हे अद्याप कुणालाही माहित झालेली नाही. या सर्व प्रकारामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावी रात्री 10 वाजताच्या सुमारास सँटेलाइटची 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली.

Recommended read: भारतात टीबी ( TB ) आजारावरील पहिली लस विकसित

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रिंग पडताच लोकांची एकच गर्दी झाल्याने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.आज सायंकाळी 7.45 ते 8 वाजताच्या सुमारास आकाशातून उल्का वर्षाव झाल्यासारखे रांगेत लाल गोळे जमिनीच्या दिशेने आले.आकाशात लाल गोळे बघून लोकांनी कुतूहलाने त्याकडे बघितले. चंद्रपूर खगोल अभ्यासक डॉ. योगेश दूधपाचारे यांना गोंडपिपरी, धाबा भागात ही घटना झाल्याचे सांगण्यात आले. मात्र तिथे फक्त लाल गोळे दिसल्याचे लोकांनी सांगितले. मात्र रात्री 10 वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे एक मोठी लोखंडी रिंग पडली ते धुमकेतू कि सॅटेलाइटचा तुकडा. ही रिंग आकाशातून कोसळलेल्या सँटेलाइटची असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशातून पडलेली ही रिंग बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार सिदेवाही पोलिस ठाण्यात रिंग जमा करण्यात आली आहे. 8 ते 10 फूट मिटरची ही रिंग आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!