चंद्रपूर: रेती पुरवठादारकडून २५ हजार रूपयांची लाच मागिल्याप्रकरणी राजुरा तालुक्यातील वरून येथील तलाठी विनोद गेडाम यांच्यावर लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recommended read: अमानुषतेचा कळस, त्याच्या पायाला भला मोठा दगड बांधून सोडले नदीत

तक्रारदार यांचा रेती पुरवण्याचा व्यवसाय असून ८ फेबु्रवारी २०२१ रोजी तलाठी विनोद गेडाम यांनी तक्रारदारचा रेतीचा ट्रक पकडुन ७० हजार रूपयांची मागणी करून ३५ हजार रूपये त्यावेळी स्विकारले. त्यानंतर ट्रक सोडून दिला. उर्वरित ३५ हजार रूपये नंतर देण्याचे ठरले होते.

Recommended read: इग्लंडचा अष्टपैलू खेळाडू Ben Stocks ने एकदिवसीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. पडताळणी दरम्यान तडजोडीअंती तलाठी विनोद गेडाम यांनी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!