चिमूर – शंकरपूर येथील एका 36 वर्षीय नराधमाने आठ वर्षीय दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीवर शुक्रवारला सायंकाळी चारच्या सुमारास अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. राजीक उर्फ काल्या 36 असे नराधमाचे नाव आहे.

Recommended read: शिंदे गटात सामील झाल्याच्या टिकेनंतर आ. किशोर जोरगेवार यांचे स्पष्टीकरण

सविस्तर वृत्त असे की पीडित मुलीचा आजोबा हा शंकरपूर येथील देशी भट्टीवर नाश्त्याची ची दुकान चालवतो त्याला लागणारा पक्का माल हा घरून पाठविला जात होता ही मुलगी आईने उकडून दिलेले अंडे आजोबाकडे नेऊन देण्यासाठी देशीभट्टीवर गेली तिथे हा नराधम नामे राजीक उर्फ काल्या वय 36 हा दारू पीत होता ही मुलगी घरी एकटी जाताना पाहून तो तिच्या मागे दुचाकीने आला व तुला घरी सोडून देतो म्हणून गाडीवर बसवून रस्त्यात असलेल्या राजीव गांधी महाविद्यालयाच्या मागे निर्जनस्थळी घेऊन गेला व तिच्यावर अमानुष अत्याचार केला.

Recommended read: चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार शिंदे गटात

याची माहिती घरी जाऊन पीडित मुलीने आपल्या आईला दिली असता मुलीच्या आईने तिला घेऊन पोलीस चौकी गाठण्यासाठी निघाली वाटेतच हा नराधम तिला रोड वर दिसला तिने त्याची कॉलर धरून पोलीस चौकी कडे नेत असताना तोफिक पान सेंटर जवळून तिला हिसका मारून त्याने पळ काढला परंतु तिच्या आईने लगेच पोलीस चौकी गाठून पोलिसांना सर्वकाही हकीगत सांगितली पोलिसांनी लगेच त्याला पकडून आणून अटक केली व कलम 376 पोस्को नुसार गुन्हा दाखल केला व रात्री नऊ वाजताच्या दरम्यान मुलीला तपासणी करता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले पुढील तपास सपोनि विनोद जांभळे व सहकारी करीत आहेत

2 thoughts on “आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, 36 वर्षीय नराधमाला अटक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!