दीडशे टाक्यांची शस्त्रक्रिया यशस्वी

चंद्रपूर : मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळी घरात एकत्र आलीत. आनंदी वातावरणात हा सर्व सोहळा सुरू असतानाच केकवर लावलेल्या ‘ बर्थडे कँडल ‘ अर्थात फवारे उडविणाऱ्या मेणबत्तीचा स्फोट झाला. यात आरंभ डोंगरे (१०) गंभीर जखमी झाला.

डॉक्टरांच्या चमूने त्या बालकावर ‘प्लास्टिक सर्जरी’ करून जवळपास १५० टाक्यांची तब्बल पाच तासांची यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता आरंभची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ब्रह्मपुरी शहरात घडली.

Recommended read: वरोरा येथे वीज कोसळून चार महिलांचा मृत्यू

चिमूर तालुक्यातील भिसी येथील रहिवासी विनोद डोंगरे, पत्नी व मुलगा आरंभ यांचेसह वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता मित्राच्या घरी गेले होते. सायंकाळी ६ वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला. केकवर असलेली फवारे उडवणारी मेणबत्ती बर्थडे कँडल पेटविण्यात आली. मेणबत्तीवर फुंकर मारल्यानंतर आरंभने ती मेणबत्ती आपल्या हातात पकडली असता तिचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्यात आरंभचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला. गालातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्याला ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Recommended read: ओला दुष्काळ जाहीर करून एकरी २५ हजार रूपयांची मदत द्या- नाना पटोले

लगेचच शुक्रवारी ‘प्लास्टिक सर्जरी’ करून त्याचा फाटलेल्या गालाचा भाग आणि जीभ जोडण्यात आली. आरंभ गंभीर अवस्थेत होता, त्याची जीभसुद्धा पूर्णतः फाटली होती. उजवा डोळा २ ते ३ सेमीने वाचला. दोन ते तीन दिवस त्याला बोलता व काहीही खाता येत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत नागपूरवरून प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पेरका यांना उपचारासाठी बोलाविण्यात आले. उपचारादरम्यान १५० टाके लावावे लागले. ही शस्त्रक्रिया आस्था रुग्णालयाचे डॉ. पंकज लडके, डॉ. सुमित जयस्वाल यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आता आरंभची प्रकृती स्थिर आहे.

डॉक्टरांच्या वेळीच उपचारामुळे त्याला जीवनदान मिळाले.

बर्थडे कँडल चा वापर करतांना सावध राहा

बर्थडे कँडल मध्ये बारुदचा वापर करून तयार केले जातात. बरुदचा वापर केल्या जात असलेल्या मेणबत्तीबाबत तक्रार करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

One thought on “बर्थडे कँडल चा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!