चंद्रपूरात १५०० फूट लांब तिरंगा यात्रा

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा यात्रा

चंद्रपूर : ‘आजादी का अमृत महोत्सवा’ निमित्त विशाल तिरंगा यात्रा १५०० फूट लांब तिरंगा ध्वजासह १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली होती.

गांधी चौकातून सुरू होणारी ही तिरंगा रॅली जटपूरा गेट येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन करून कस्तुरबा गांधी मार्गे गांधी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ समाप्त झाली.

Recommended read: अमृत महोत्सव :चंद्रपूरात ७ कोटी रूपयांच्या राष्ट्रध्वजाची विक्री

नवीन पिढीचा उत्साह वाढवण्याकरिता तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी बलिदान दिले, लढ्यात योगदान दिले, कारावास भोगला अशा स्वातंत्र्यवीरांची आठवण करून त्यांना मानवंदना देण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नवीन पिढीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सदरची तिरंगा रॅलीचे आयोजन संयोजक, ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!