Tattoo काढताना एकच सुई वापरल्याने 14 जणांना एचआयव्हीची लागण

मुंबई: सध्याच्या अनेक लोकांना Tattoo गोंदवून घेण्याचे वेड आहे. टॅटू काढणाऱ्याने टॅटूच्या सुईचे पैसे वाचावे यासाठी टॅटूची सुई न बदलता अनेकांचे टॅटू काढल्यांना १४ जणांना एचआयव्ही झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Recommended read: १० हजारांची लाच घेतांना खाजगी इसमासह कृषी सहाय्यकास अटक

Tattoo ही एक फॅशनची बाजू म्हणून बरेचजण टॅटू गोंदवून घेतात. मात्र याच टॅटूसंदर्भात उत्तर प्रदेशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टॅटू गोंदवनं उत्तर प्रदेशातील 14 जणांना महागात पडलं आहे.

वाराणसीमध्ये 14 जणांना tattoo साठी वापरण्यात आलेल्या सुईनं मृत्यूच्या दाढेत ढकललं आहे. या 14 जाणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला आहे. त्यानंतर त्यांनी तापाची तपासणी केली असता निगेटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना एचआयव्ही ची तपासणी करण्यासाठी सांगितले असता या चौदाही नागरिकांची एचआयव्ही तपासणी सकारात्मक आली आहे.

Recommended read: पोराच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून बापाने केला खून

या घटनेमुळे या नागरिकांना जबर धक्का बसला आहे. त्यांनी असुरक्षित लैंगिक संबंध अथवा कोणत्याही व्यक्तीचे रक्त घेतले नव्हते त्यामुळे त्यांना एचआयव्ही होण्याचा धोका नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!