बाबुपेठ येथील डॉ. शरयु पाझारे यांच्या सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर मनपातर्फे कारवाई

चंद्रपूर: समाजाने आखून दिलेली लक्ष्मण रेषा पार केल्याने काय परिणाम भोगावे लागतात, हे एका प्रकारामुळे समाजापुढे आले आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात एका १३ वर्षीय मुलीला सहा महिन्यांची गर्भवती व्हावे लागले. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

Recommended Read: दहा महिण्यांपासून बेपत्ता असलेल्या युवतींचा सांगाळा मिळाल्याने खळबळ

चिमूर तालुक्यातील एका गावात सातव्या वर्गात शिकणारी एक १३ वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गर्भवती आहे, तर तिला गर्भधारणा करणारा मुलगाही अल्पवयीन, म्हणजे पंधरा वर्षांचा आहे. दोघांचे घर जवळचे असल्याने या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यातूनच त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. यातून तिला गर्भधारणा झाली. याची पुसटशी कल्पनाही त्या मुलीला आली नाही.

Recommended Read: ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर वाघाचा मुक्तसंचार

परंतु सहाव्या महिन्यात तिचे पोट दुखत असल्याने आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यावेळी ती गर्भवती असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. ज्या वयात आईची ममता कळत नाही त्या वयात ती आता आई बनणार आहे. आधुनिक काळात मोबाइल, फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्युब असे आधुनिक गोष्टी मुलांच्या हातात आल्या आहेत. मुले, मुुली नको त्या वयात नको त्या गोष्टी पाहायला लागले आहेत. जिथे शिक्षणाची ओढ निर्माण व्हायला पाहिजे तिथे शारीरिक संबंधाकडे आकर्षण निर्माण होत आहे. यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून, मुलाला बालसुधारगृहात पाठविले आहे. तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!