प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचा विसर

चंद्रपूर: जिल्ह्यातील प्रदूषणाचा आलेख वाढता असताना सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना शंखपुष्पी भेट देत स्मरणशक्ती वाढविण्याचा सल्ला देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Recommended read: ताडोबात ‘विरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

जिल्ह्यातील चंद्रपूर, घुग्गुस, ताडाळी या प्रदूषित एमआयडीसी मधील रासायनिक, सिमेंट विटा, स्टील, औष्णिक विद्युत केंद्र, ऑईल कंपनी यामुळे गंभीर वायू प्रदूषण होत असून हवेची व पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे यामुळे अनेक स्थानिक नागरिकांना श्वसनाचे, त्वचेचे आजार होत आहे तर काही कामगारांना फुफुसाचे कॅन्सर झाल्याची बाब पुढे आली आहे. ही बाब गंभीर असून रोजगाराचा विचार करताना आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे करीता कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याने. यावर येत्या महिन्याभरात ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी मनसेचे व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, विधी सेल अध्यक्ष मंजू लेडांगे, सुनील गुडे, किशोर मडगूलवार, कुलदीप चंदनखेडे, विवेक धोटे, मनोज तांबेकर, युगल ठेंगे, सुयोग धनवलकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!