स्वदेशी बनावटीची इलेक्ट्रिक स्कूटर

गडचांदूर: इंधन बचतीसह प्रदूषणावर ही बसेल आळा चंद्रपूर- सिमेंट सिटी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर येथील एका होतकरू युवकाने स्वदेशी बनावटीची इलेक्ट्रिक स्कूटर साकारली असून त्याच हे नवं संशोधन नवयुवकांना प्रेरणादायी ठरणारे ठरत आहे.

Recommended read: खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक आरोपीमध्ये शिक्षक व शिक्षकांचा मुलगा

राकेश नागेश पेटकर असे त्याचे नाव असून २०१८ च्या बॅचचा मेकॅनिकल विद्याशाखेतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय , चंद्रपूर चा विद्यार्थी आहे. काहीतरी नवं करण्याच्या जिद्दीने त्याने हे अभिनव संशोधन केले आहे. घरच्याच बजाज कंपनीच्या पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये रूपांतर त्यांनी केले आहे. ही स्कूटर अवघ्या तीस रुपयाच्या चार युनिटमध्ये ६५ किलोमीटर प्रतितास गतीने शंभर किलोमीटरचे अंतर पार करते. बाजारातील अनेक चायनीज बनावटीच्या बाईकला ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वदेशी उत्तम पर्याय ठरते आहे.

आज-काल इंधनाचे दर गगनाला भिडत चालले आहे. त्यामुळे पेट्रोल बाईक न परवडनारी झाली आहे. तसेच प्रदूषनाने उचांक गाठला असताना पर्यावरण पूरक ही स्कूटर प्रत्येकालाच आकृष्ट करत आहे. राकेशनी यासोबतच इलेक्ट्रिक बुलेट वर ही काम सुरू केले असून लवकरच तो ही अविष्कार जगासमोर येणार आहे.

राकेश यांनी भुवनेश्वर येथील स्काय रायडर इन्स्टिट्यूट येथून ऑटोमोबाईल मोबाइल डिझाईनिग अंड मनुफॅक्चरिंग चा कोर्स केला आहे. त्याचे वडील नागेश पेटकर याचं गडचांदूर येथे स्वतःचं दुचाकी दुरुस्तीच गॅरेज आहे. त्याच्या या कृतिशील संशोधनाने कोरपना तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील नवसंशोधकाना ही प्रोत्साहन प्राप्त झाले आहे.

2 thoughts on “गडचांदूरच्या रंचोनी बनविली इलेक्ट्रिक स्कूटर”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!